Tuesday 18 October 2022

29 सप्टेंबरचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयः महिला अधिकार संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल


   

29 सप्टेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की 20 ते 24 आठवड्यांच्या दरम्यान गर्भधारणा असलेल्या अविवाहित महिलांना, विवाहित महिलांप्रमाणेच सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार आहे.

आता हा लेख वाचत असतांना पाठकांच्या  मनात एक सहजिक प्रश्न येवू शकतो की हा निर्णय आल्यानंतर एवढ्या दिवसांनी का म्हणून या संदर्भात आपण विचार करावयास हवा? त्याचे स्पष्टीकरण असे आहे की आपल्या सामाजिक अणि राष्ट्रिय जीवनात काही घटना अश्या घडतात की येणाऱ्या पिढ्यांना किती तरी वर्ष्यां पर्यन्त ते मार्गदर्शण करणाऱ्या ठरतात. उदा. भारताचे कायदे मंत्री असतांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावित केलेले हिन्दू कोड बिल.” 

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 29 सप्टेंबर रोजीचा आपला निर्णय सुनावताना असे निरीक्षण नोंदवले की भारतातील गर्भपात कायद्यांतर्गत विवाहित आणि अविवाहित महिलांमधील फरक कृत्रिम आहे आणि केवळ विवाहित महिलाच लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात असे समझने चुकीचे आहे”. म्हणजेच काय तर  अविवाहित स्त्रिया ज्या पुरुषांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा ज्या स्त्रिया लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत त्या देखील त्यांच्या आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवू शकतात आणि त्यांना गर्भधारणा होऊ शकते.

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय एका 25 वर्षीय अविवाहित महिलेने जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयात आणलेल्या याचिकेवर आला होता. ती 25 वर्ष्यांची महिला 22 आठवड्यांची गर्भवती होती. त्या महिलेने सांगितले की तिला गर्भपात हवा आहे कारण तिच्या जोडीदाराने शेवटच्या क्षणी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला आणि विवाहबाह्य मूल झाल्यामुळे तिला सामाजिक कलंक आणि  छळास सामोरे जावे लागेल. पुढे तिने नयालयस सांगितले की तिला नोकरी नसल्यामुळे आणि ती आर्थिक दृष्टया दुर्बळ असल्यामुळे मुलाचे संगोपन करणे तिला झेपणारे नाही आणि त्यामुळे ती मूल वाढवायला मानसिकदृष्ट्या तयार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने तिची गर्भपाताची याचिका फेटाळल्यानंतर त्या महिलेने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

भारतात 1971 पासून गर्भपात कायदेशीर आहे, परंतु गेल्या काही वर्षांत अधिकार्यांनी गर्भधारणा कोण आणि कोणत्या अवस्थेपर्यंत संपुष्टात आणता येईल यासाठी कठोर नियम बनवले आहेत. याचे कारण असे की, पुरुष मूलाच्या पारम्परिक अट्टाहासामुळे लाखो स्त्री भ्रूणांचा गर्भपात केला गेला आहे. त्यामुळे देशातील लिंग गुणोत्तर खूपच कमी झाले आहे. यामुळे गर्भपातासम्बन्धी नियम भारतात इतके कडक झाले की बलात्कारातून वाचलेल्या महिलांनाही  की  ज्यांना आपण गरोदर असल्याची कल्पनाही नव्हती. पण 20 आठवड्यांनंतर गर्भधारणा झाल्याचे आढळून आल्यास ते टाळण्याची परवानगी घेण्यासाठी न्यायालयात जावे लगत होते.

अशा अनेक प्रकरणांनंतर, सरकारने गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मधे 1971 च्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट (एमटीपी) या कायद्या मधे सुधारणा केली. या सुधारणे अंतर्गत अनेक श्रेणीतील महिलांना 20 ते 24 आठवड्यांदरम्यान गर्भपात करता येण्या संबंधीच्या तरतुदी करण्यात आल्या. 1971 च्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट अंतर्गत विवाहित महिलांना 12 ते 20 आठवड्यांच्या दरम्यान गर्भपात करण्याची परवानगी होती. गर्भधारणेपासून 12 आठवड्यात गर्भपात करायचे असल्यास एका डॉक्टरच्या सल्ल्याची आवश्यकता होती पण गर्भधारणा जर 12 ते 20 आठवड्या पर्यंतची असल्यास दोन डॉक्टरांच्या अनुमतीची आवश्यकता होती. 1971 च्या या कायद्या अंतर्गत केवळ विवाहित महिलांना अणि कही विशेष परिस्थित अविवाहित महिलांना देखील गर्भपात करण्याची अनुमति होती.

१२ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्यासाठी ठरविल्या गेलेल्या निकषांमधे - (1). गर्भधारणा सुरू राहिल्यास गर्भवती महिलेच्या जीवाला धोका किंवा तिच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याला गंभीर इजा होऊ शकते अशी परिस्थिति, (2). जर मूल जन्माला आले तर त्याला कोणत्याही गंभीर शारीरिक किंवा मानसिक विकृतीचा सामना करावा लागेल असा मोठा धोका आहे असे डॉक्टरांचे निदान झाल्यास, अणि (3) कोणत्याही दाम्पत्यानी कुटुंब नियोजनासाठी वापरलेली गर्भनिरोधकची पद्धत अयशस्वी झाल्यामुळे गर्भधारणा झाल्यास.

1971 च्या कायद्या अन्वये ज्या स्त्रिया 20 आठवड्यांच्या आत म्हणजेच काही विशेष परिस्थित गर्भपात करू इच्छित होत्या  त्यांना 7 श्रेणींमध्ये वर्गीकृत केल्या गेले (1). लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार किंवा incest म्हणजेच भावा-बहिणी मधे यौन सम्बन्ध अणि त्यातून गर्भधारणा झालेल्या महिला, (2). गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन नासमज मूली, (3). चालू गर्भधारणेदरम्यान वैवाहिक स्थितीत बदल उदा. विधवा झालेल्या  किवा ज्यांचा घटस्फोट झालाय अश्या महिला, (4). शारीरिक अपंगत्व असलेल्या महिला (अश्या महिलेच्या अपंगत्वाचे निकष  2016 च्या अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम या कायद्या अन्वये ठरविले जाणार होते), (5). गर्भधारणा झालेल्या पण मतिमंदतेसह मानसिकदृष्ट्या आजारी महिला, (6).  जन्माला येवू घातलेले मूल जर गंभीरपणे अपंग होण्याची अथवा  शारीरिक किंवा मानसिक विकृतींना बळी पडू शकण्याचे निदान डॉक्टरांनी केलेले असल्यास, अणि (7). सरकारने घोषित केल्याप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीच्या वातावरणात किंवा आपत्ती किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत गर्भधारणा असलेल्या स्त्रिया.

1971 च्या गर्भपातासम्बंधिच्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट या कायद्यामधे काही मुलभुत सुधारणा केल्या गेल्या. त्यास मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट (अमेंडमेंट) बिल म्हणून नाव देण्यात आले. या सुधारणे अंतर्गत बाकीच्या अटी कायम ठेवत असतांना आधीचा 12 आठवाड़े अणि 20 आठवड्याचा कालावधि 20 अठवाड़े अणि 24 आठवड्यापर्यंत वाढविल्या गेला. यासोबतच 2021 सालच्या सुधारित कायद्यात पूर्वीच्या विवाहित स्त्री किंवा तिचा पतीया तरतुदीच्या ऐवजी  कोणतीही स्त्री किंवा तिचा जोडीदारअसा वाक्यांश देखील घातल्या गेला. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट या कायद्याच्या योजनेतून विवाहित स्त्री किंवा तिचा पतीहा शब्द काढून टाकून कोणतीही स्त्री किंवा तिचा जोडीदारअसा उल्लेख केल्यामुळे, विवाह संस्थेच्या बाहेर होणारी गर्भधारणा देखील कायद्याच्या संरक्षणात्मक छत्रात आणण्यात आली.

परन्तु केंद्रीय विधिमंडळाच्या या ऐतिहासिक दुरुस्तीनंतरही त्यात अनेक संदिग्धता राहिल्या होत्या. त्यामुळे  दिल्ली उच्च न्यायालयाने 25 वर्षीय महिलेची तिच्या गर्भाशयात असलेल्या गर्भाचा गर्भपात करण्याची याचिका नाकारली. म्हणून त्या महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली अणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अंतरिम आदेशनवाये तिला गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी दिली होती. 

पुढे यासंदर्भात न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, ए एस बोपण्णा आणि जे बी पार्डीवाला यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने गुरुवारी दिनांक 29 सप्टेम्बर रोजी  हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यात त्यांनी म्हटले की, गर्भ 20-24 आठवड्यांच्या असताना काही अपवादात्मक कारणास्तव गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये फरक करणे घटनाबाह्य आहे.

आपल्या निकलात माननीय न्यायधीशांनी नमूद केले की आपल्या गर्भाशयातील गर्भास जन्म देणे अथवा  गर्भपात करणे हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्या महिलेस आहे. अवांछित गर्भधारणा तिच्या शिक्षणात, तिच्या करिअरमध्ये व्यत्यय आणू शकते, तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते  किवा  तिच्या संपूर्ण आयुष्यावर विपरित परिणाम करू शकते. त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या  शारीरिक स्वायत्ततेचा आणि स्वतःच्या जीवनाचा मार्ग निवडण्याचा अधिकार असायलाच हवा.

न्यायालयाने असेही म्हटले आहे की अविवाहित महिलांना गर्भपात करण्याच्या अधिकारपासून वगळणे हे त्यांना असुरक्षित गर्भपात करण्यास प्रवृत्त करू शकते की ज्यामुळे भारतात अनेक महिलांचा मृत्यु होतो. यूएन पॉप्युलेशन फंडच्या अहवालाप्रमाणे, असुरक्षित गर्भपाताशी संबंधित कारणांमुळे आपल्या देशात दररोज सुमारे आठ महिलांचा मृत्यू होतो.

न्यायमूर्तींनी निदर्शनास आणून दिले की जसा-जसा समाज बदलतो आणि विकसित होतो, तसे-तसे आपले विचार अणि आपल्या सामाजिक रूढ़ि बदलायला हव्यात. बदललेल्या सामाजिक संदर्भात आपल्या कायद्यांची पुनर्रचना होण्याची निकड लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे कायद्याची यापुढे "संकुचित पितृसत्ताक तत्त्वांवर" आधारित व्याख्या केली जाऊ शकत नाही. "समाज स्वीकृत लैंगिक सम्बन्ध किवा परमिसिबल सेक्स " काय आहे याचा अर्थ लावला जाऊ शकत नाही कारण भारतीय समाज आणि कुटुंब व्यवस्थे मधे गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदल झाले आहेत. लिव्ह-इन रिलेशनशिप्स, विवाहपूर्व लैंगिक संबंध आणि समलिंगी लैंगिक संबंध इत्यादींकडे यापुढे "गुन्हेगारीच्या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ शकत नाही.

सर्वोच्च न्यायलाचा हा निकाल अनेक वृत्तपत्रांच्या हेडलाइनचा मुद्दा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यात वैवाहिक बलात्कार "मैरिटल रेप"  बद्दल पण चर्चा आलेली आहे. याबाबत आपले मत नोंदवतांना माननीय न्यायधीश म्हणाले की त्यांचा आदेश वैवाहिक बलात्काराच्या कायदेशीरपणाबद्दलचा नाही आहे कारण त्याची सुनावणी दुसर्‍या खंडपीठाकडून होते आहे. परंतु ते म्हणाले की जर एखादी स्त्री पतीच्या लैंगिक अत्याचारामुळे किंवा बलात्कारामुळे गर्भवती झाली असेल तर, तिला मानसिक आणि शारीरिक हानी पोहोचवणाऱ्या जोडीदारासोबत मुलाला जन्म देण्यास आणि वाढवण्यास भाग पाडले जाऊ नये.

 यावरून आपणास लक्षात येईल की सर्वोच्च न्यायालयाचा हा निवाड़ा ऐतिहासिक अणि आपल्या समाज व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून  आणण्याची क्षमता असलेला आहे. अणि त्यामुळेच अनेक स्त्रिया, विविध स्त्रीवादी संघटना अणि समाजाच्या विविध समुहांकडून याचे स्वागतच झाले.

वैश्विक मानवी समुदायात गर्भपात वादविवाद हा प्रदीर्घ काळ चाललेला मुद्दा आहे. जो गर्भपाता विषयीच्या नैतिक, कायदेशीर, वैद्यकीय आणि धार्मिक पैलूंना स्पर्श करतो. विशेतः पश्चिमेतल्या देशांमधे हा वादविवाद प्रामुख्याने  "प्रो-चॉईस" आणि "प्रो-लाइफ" या मतांच्या भोवती धृवीकृत झालेला दिसतो. "प्रो-चॉइस" या मतला मानणारे, स्त्रीच्या शारीरिक स्वायत्ततेच्या अधिकारावर जोर देतात तर "प्रो-लाइफ" मताच्या लोकांचा युक्तिवाद आहे की गर्भ हा कायदेशीर संरक्षणास पात्र आहे, जो आईच्या इच्छेपासून वेगळा आहे, त्याला स्वताचे अस्तित्व आहे अणि आई त्याला मारू शकत नाही. प्रो-लाइफ मताच्या लोकांच्या वैचारिक स्थिति वर प्रामुख्याने बाइबल अणि कुरान मधे सांगितलेल्या तत्वांचा म्हणजेच रिलिजन चा प्रभाव आहे.

गर्भपात पूर्णपणे प्रतिबंधित कारणाऱ्या काही देशांमधे इजीप्ट, इराक, अल साल्वाडोर, माल्टा, व्हॅटिकन सिटी, डोमिनिकन रिपब्लिक, फिलीपिन्स आणि निकाराग्वा इत्यादींचा समावेश. नाइजेरिया, ब्राज़ील अणि मेक्सिको या देशांमधे केवळ अणि केवळ आईच्या जिवास धोका आहे असे डॉक्टरांचे निदान असल्यासच गर्भपात करण्याची अनुमति आहे  अन्यथा नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेतील महिलांच्या गर्भपाताच्या अधिकारांवर अत्यंत लज्जास्पद आणि अत्यंत प्रतिगामी निर्णय दिला आहे. २४ जून २०२२ ला अमेरिकेच्या  सर्वोच्च न्यायालयाने 1973 सालचा 50 वर्षांचा "रो विरुद्ध वेड"चा निर्णय रद्द केल्याने अमेरिकेतल्या 360 लाख महिला गर्भपाताचा घटनात्मक अधिकार गमावतील अशी शक्यता आहे. त्याचप्रमाणे पोलंड, हंगेरी आणि इटलीसारखे युरोपीय देश देखील गर्भपाताच्या बाबतीत अत्यंत प्रतिगामी कायदे लादत आहेत किवा तेथे तश्या प्रकारचे कायदे अमलात आणले जाण्यासारखी परिस्थिति आहे.

जागतिक स्तरावर मानवी अधिकारांचा दरोगा म्हणून मिरविणाऱ्या अमेरिकेचे अणि तिचे मित्र असलेल्या युरोपातल्या देशांचे हे अशोभनी  य कृत्य आंतरराष्ट्रीय मानवाधिकार करार आणि मान्य केलेले मानदंड उदा.The Convention on the Elimination of All Forms of Discrimination Against Womenअणि United Nations Sustainable Development Goals’ मधील तरतुदींची सरळ-सरळ पायमल्ली आहे.

म्हणूनच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने विवाहित अणि अविवाहित तसेच वैवाहिक बलात्कारला बळी पडलेल्या महिलांना दिलेला 29 सेप्टेम्बर, 2022 चा सुरक्षित गर्भपाताचा निकाल क्रन्तिकारी अणि युगप्रवर्तक आहे असे म्हटल्यास वाउगे ठरू नये. या निर्णयद्वारे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या सुरक्षेसाठी भारताच्या घटनात्मक तरतुदींना अधिक बळकटी प्राप्त करून दिली असेच म्हणता येईल. आपल्या निर्णयाद्वारे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम 14 मध्ये प्रदत्त कायद्यासमोर समानता (Equality Before Law) आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 मध्ये प्रदान केल्यानुसार जगण्याचा अधिकार (Right to Life) या बाबीना  भारतातल्या महिलांसाठी उचलून धरले. यासोबतच महिलांच्या मानवाधिकारा सम्बन्धी अंतर्राष्ट्रीय करार अणि मानदंड यांच्याशी सुसंगत अशी भूमिका घेतली जे "वसुधैव कुटुम्बकम" या भारतीय तत्वाला अनुसरुनच आहे.

पण मग प्रश्न उरतो की भारतीय महिलांच्या संरक्षणासाठी अनेक घटनात्मक तरतुदींसोबतच मेडिकल टर्मिनेशन ऑफ़ प्रेगनेंसी एक्ट किवा कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा,2005 असल्या प्रकारचे कायदे आपल्या देशात का म्हणून करावे लागतात आहे? का म्हणून आपल्या न्ययालयांना महिलांच्या सुरक्षेसाठी वारंवार असे निकाल द्यावे लागतात आहे? आपण आधी पासूनच महिलांचा अनादर करणारी संस्कृति आहे काय?

या प्रश्नांचे उत्तर असे आहे की आपल्या चिर सनातन सभ्यतेमधे महिलाना अत्यंत आदराचे स्थान होते. आपल्या प्रातस्मरणीय मन्त्रात आपण म्हणतो ना--

      काराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।

      करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।

किंवा आपल्या जन्मभूमीसाठी आपण म्हणतो ना---

           समुद्र वसने देवी पर्वत स्तनमण्डले

           विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे। 

आताच आपण नवरात्रींमधे माँ दुर्गेची पूजा केली. दिवाळीत माता लक्ष्मीची पूजा करणार. महाराष्ट्रात आपण तुळजा भवानीची, विठल अणि रखुमाईची  पूजा करतोच ना? मुक्ताई, संत जनाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, बहिणाबाई चौधरी अशा कितीतरी विदुषी महाराष्ट्रात होऊन गेल्यात.

सांस्कृतिक भारताच्या पुरातन, मध्ययुगीन अणि आधुनिक इतिहासात  अरुंधति, अनुसया, सावित्री, जानकी, सती, द्रौपदी, कन्नगी, गार्गी, मीरा, दुर्गावती, लाक्षीबाई, चेनम्मा, रूद्रमाम्बा, माँ शारदा, भगिनी निवेदिता, ताराबाई शिंदे, इरावती कर्वे, कॅप्टन लक्ष्मी सहगल अशी कितीतरी विलक्षण नावे सांगता येतील. त्या सगळ्यांनी प्राचीन काळापासून आतापर्यंत आपल्या सामाजिक अणि राष्ट्रिय जीवनात अनन्यसाधारण योगदान दिलय अणि अनेक महिला आजही देतात आहे अणि पुढेही देत राहतील. 

कालौघात महिलांच्या सदर्भात काही मिथ्याचार आपल्या समाजात रूढ़ झालेत. एक तर अपन त्यांना देवीस्वरूप मानुन देवारयात बसविलं अथवा दुय्यम दर्जाच्या मानुन त्याना स्वयंपाक घरात बंद केलं. ह्या दोन्ही गोष्टी थांबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी  समाज अणि कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता आहे.  समाज अणि कुटुंब प्रबोधन घरा-घरात, पाड्यांमधे, गावांमधे, शहरांमधे, सार्वजनिक ठिकाणी सामाजिक चळवळ म्हणून उभे राहायला हवे. केवळ राज्याने वेळो-वेळी केलेले कायदे अणि न्ययालयांनी दिलेले निकाल  यामुळे अपेक्षित परिणाम साध्य होणार नाहीत.

राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे पूज्यनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवतजीनी आपल्या विजयादशमीच्या सम्बोधनात म्हटल्याप्रमाणे  चिरपुरातन अणि नित्य नूतन या दोन्हीची सांगड घालता येणे आपणास जमले पाहिजे. जुने जाऊ दया मरना लागूनी जाळुनी किवा पुरुनि टाका असे म्हणून चालणार नाही. आपल्या जुन्यातले जे उत्तम, उद्दात अणि उन्नत आहे त्याचे पालन व्हायलाच हवे. जे जीर्ण अणि अप्रासंगिक आहे त्याचा त्याग व्हायलाच हवा.

 

Saturday 8 October 2022

आदरणीय हर्षजी चौहान, अध्यक्ष, राष्ट्रीय जनजाति आयोग





आदरणीय हर्ष चौहानजी के साथ मेरा परिचय लगभग पांच वर्ष पूर्व वनवासी कल्याण आश्रम के कार्यकर्त्ता के नाते हुआ. उनके सौम्य स्वभाव एवं समाज, विशेषकर जनजाति समाज के सर्वांगीण विकास लिए उनकी गहरी दृष्टि का मैं मुरीद हुआ. उनसे हुए प्रत्येक संवाद मे मैंने अनुभव किया कि उनके समाज के प्रति विचार केवल अकादमिक डिस्कोर्स तक सिमित नहीं हैं. उनकी शिक्षा पूर्ण होने के बाद से ही उन्होंने स्वयं को समाज कार्यों मे समर्पित कर दिया हैं. समाज के प्रति उनके विचार एवं दृष्टि समाज मे प्रत्यक्ष रहकर कार्य करने से प्रेरित हैं.

श्री. हर्ष चौहानजी का जन्म 8 अक्टूबर 1960 को हुआ. उनके पिता स्व. भारत सिंह चौहानजी स्वतंत्रता सेनानी थे. उन्होंने 14 वर्षों तक भूमिगत रहकर ब्रिटिशों के विरुद्ध क्रन्तिकारी आंदोलन चलाया था. वे 1967 से 1980 तक भारतीय जनसंघ से मध्य प्रदेश के धार लोक सभा चुनाव क्षेत्र से सांसद रहें. इसलिए समाज एवं राष्ट्र के लिए समर्पण भाव से कार्य करने के संस्कार श्री. हर्षजी को विरासत मे ही मिले. इस विरासत को जीवित रखते हुए वे इस पथ पर निरंतर कार्यरत हैं.

 

उन्होंने S.G.S.I.T.S. इस इंदौर स्थित प्रख्यात अभियांत्रिकी महाविद्यालय से Mechanical Engineering मे 1982 स्नातक की शिक्षा पूर्ण की. उसके उपरांत IIT, दिल्ली से 1984 मे उन्होंने Systems and Management मे M. Tech किया. उन्होंने 1990 मे देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदौर से पत्रकारिता मे स्नातक भी किया हैं. 1988 से वे सामाजिक कार्यों मे सक्रिय हैं और जनजाति समाज के सर्वांगीण विकास को लेकर समर्पित भारत के सबसे बड़े संगठन, वनवासी कल्याण आश्रम में उन्होंने विविध प्रांतीय एवं राष्ट्रिय दाइत्वों का निर्वहन किया है. पद्मश्री आदरणीय महेश शर्माजी के साथ मिलकर उन्होंने 1998 में "शिवगंगा" (शिवगंगा समग्र ग्राम विकास परिषद्) इस संस्था की स्थापना की. 

"शिवगंगा" यह संस्था मध्य प्रदेश के झाबुआ इस दुर्गम जिले में कार्य करती है. बड़े पैमाने पर पेड़ों की कटाई के कारण झाबुआ की जमीन बंजर हो गई थी. परिणामस्वरूप झाबुआ में रहनेवाले जनजाति समाज की उपजीविका छीन गई और उनका बड़ी संख्या में स्थलांतरण होने लगा. जनजातीय समाज के स्थलांतरण के मायने उनके शोषण से भी जुड़े होते है. आदरणीय श्री महेश शर्माजी और श्री हर्षजी ने साथ मिलकर इस समस्या पर उपाय ढूंढ़ने हेतु "शिवगंगा" की स्थापना कर जनजाति समाज में स्वाभिमान जगाया.

आज पारंपरिक जनजातीय  "हलमा" (सामूहिक श्रमदान) प्रथा को नवसंजीवनि देते हुए  शिवगंगा के असंख्य कार्यकर्ताओं ने बड़ी मात्रा में वृक्षारोपण किया और बड़ी संख्या में छोटे तालाब बनाकर जलसंवर्धन किया. इससे झाबुआ में रहनेवाले  जनजातीय समाज को उनकी खोई हुई उपजीविका और एक बार प्राप्त हो रही है. इसीकी के साथ, "शिवगंगा" के माध्यम से  जनजातीय समाज का सामाजिक नेतृत्व खड़ा करना, वनीकरण, महिला सश्क्तिकरण, बिखरे हुए समुदायों को साथ में जोड़ना आदि कार्य सफलतापूर्वक किये जा रहे है.  

मेरे विचार में श्री हर्ष जी की राष्ट्रिय जनजाति आयोग के माननीय अध्यक्ष के पद पर नियुक्ति यह समस्त जनजाति समाज के लिए शुभ संकेत है. उन्होंने अपनी उच्च शिक्षा अभियांत्रिकी जैसे आकर्षक एवं उच्च वेतन देनेवाली शाखा से प्राप्त की है. पढाई के बाद उस समय जब निजी नौकरी के लिए विदेश जाने की होड़ लगी रहती थी, तब उन्होंने वनवासी समाज के बारे में सोचा और जीवन पर्यन्त जनजाति समाज के उन्नति के लिए कार्यरत रहने का निर्णय लिया.

श्री हर्षजी चौहान इंदौर संभाग के झाबुआ, जिसमे लगभग दो करोड़ जनजातीय समाज के लोग रहते है, मे पिछले 35 वर्षों से कार्यरत है. समस्त भारत भर के जनजातीय समाज से उन्होंने निरन्त सरोकार रखा है और उनसे जुड़े हुए विषयों का उन्होंने गहरा अध्यन किया है. उन्होंने जनजाति समाज के सामर्थ्य को समझते हुए परमार्थ की प्रेरणा से काम करने की पद्धति का विकास किया है. जनजाति समाज और नगरीय समाज में जो प्रतिमा और वास्तविकता का अंतर है उसे दूर करने के लिए वे निरंतर प्रयासरत है. स्वयं जनजाति समाज से आने के कारण उन्होंने जनजाति समाज की परम्पराएं एवं उनके आदर्शों की उपेक्षा देखि है. वर्ष 2021 के फरवरी माह में उनकी  राष्ट्रिय जनजाति आयोग के माननीय अध्यक्ष के रूप नियुक्ति के बाद से वे भारत के जनजाति समाज के संवैधानिक अधिकारों को लेकर और अधिक सक्रियता से कार्य कर रहे है.


राजनीति विज्ञान का छात्र और शिक्षक होने के नाते और काफी समय तक सिविल सेवाओं की तैयारी करने के कारण, मैं संवैधानिक निकायों के बारे में पढ़ता रहा हु और उनके अधिकार क्षेत्र एवं कार्यशैली को समझने का प्रयास करता रहा हु. राष्ट्रिय जनजाति आयोग के बारे में मेरी राय यह रही हैं कि वह राज्य एवं केंद्र में सरकारी नौकरियों  के  रोस्टर की विसंगतियां एवं काम की जगह पर भेदभाव के कुछ मामलों पर चर्चा करनेवाली संस्था मात्र बनकर रह गया था. आयोग के व्यापक कार्याधिकार की एक प्रकार से उपेक्षा ही होती दिखाई पड़ती थी.  श्री हर्ष चौहानजी के अध्यक्ष के दाइत्व पर नियुक्त हो जाने के पश्चात आयोग की व्यापकता को पुनः स्थापित करने के भरसक प्रयास उनके द्वारा किये जा रहे है.


पेसा अधिनियम, 1996 एवं  वन अधिकार अधिनियम, २००६ इन भारत सरकार द्वारा पारित दो अधिनियमों में जनजाति समाज के सांस्कृतिक जीवन को सम्बलता प्रदान   करते हुए उनके आर्थिक क्रियाकलापों में उन्ही की साझीदारी से आमूलाग्र सकारात्मक बदलाव के पर्याप्त प्रावधान है. परन्तु प्रशासकीय उदासीनता एवं जनजाति समाज में व्याप्त इन दोनों अधिनियमों की जानकारी के आभाव के कारण क्रियान्वयन में अनेक विसंगतियां पाई गई है. हर्षजी इन बाधाओं से अच्छे से परिचित रहे है. इसलिए आयोग के अध्यक्ष का कार्यभार ग्रहन करते ही उन्होंने इसपर कार्य कार्य करने की सकारात्मक पहलकदमी की. नीतिनिर्धारक, इन अधिनियमों के क्रियान्वयन से सम्बंधित जनजाति सहकारिता मंत्रालय, वन एवं पर्यावरण मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय के प्रशासकीय अधिकारी एवं जमीनी स्तर पर काम कर रहे विद्वान और कार्यकर्ताओं के मध्य "संवाद" का उपक्रम राष्ट्रिय जनजाति आयोग के मंच के तहत आयोजित किया गया. इस "संवाद" में पेसा एवं वनाधिकार अधिनियम के वास्तविक क्रियान्वयन से सम्बंधित मुद्दे एवं विसंगतियों पर विस्तृत चर्चा हुई और उनको दूर करने के प्रयास किये जा रहे है.    


पिछले एक वर्ष भर से हम पूरे देश भर में आजादी का अमृत महोत्सव मना रहे हैं. परन्तु ये हमारे लिए सोचने जैसी बात है क़ि आज़ादी के इतने वर्षों के पश्चात् भी हमने  जजातीय नायकों को हमारे स्कूली पाठ्यक्रम और शिक्षा में उचित स्थान नहीं दिया था. वनवासी कल्याण आश्रम और हर्षजी  के प्रयासों के कारण, 125 विश्वविद्यालयों में पूरे भारत में जनजाति  स्वतंत्रता सेनानियों एवं क्रांतिकारियों के विलक्षण योगदानों का स्मरण किया जा रहा है. इन कायक्रमों के  स्थान पर आयोग की जानकारी भी जनजातीय विद्यार्थी, शोधार्थी एवं युवकों को दी जा रही है ताकि भविष्य में वे इस संवैधानिक संस्था के कार्य एवं अधिकारों को जाने और अन्यों को भी बताएं.

देश भर के 125 विश्वविद्यालयों में आयोजित हो रहे "स्वतंत्रता संग्राम में जनजाति नायकों का योगदान" इस कार्यक्रम को लेकर मेरा भी आयोग के जानकर के नाते महाराष्ट्र के शिवाजी विश्वविद्यालय, कोल्हापुर एवं गोंड़वाना विश्वविद्यालय, गडचिरोली में जाना हुआ. इन कार्यक्रमों के दौरान अनेक लोग अपनी समस्याएं लेकर मेरे पास आएं और उन्होंने मुझे माननीय हर्षजी को उनसे अवगत कराने के लिए कहा. उनकी शिकायतों में मुख्य रूप से जाति प्रमाण पत्र जारी करना, कुछ जातियों को अनुसूचित जनजाति की श्रेणी में शामिल करना आदि शामिल हैं.

इस बारे में मैं विश्वास के साथ कह सकता हु कि माननीय हर्षजी पूरी ऊर्जा के साथ कार्य कर रहे है. परन्तु जनजाति समाज से सम्बंधित समस्याओं का स्वरुप बहुत जटिल है. कुछ चालाक लोग जनजाति समाज के मासूमियत का फायदा उठाकर अनुसूचित जनजाति के लोगों को मिलने वाले लाभों को हड़प रहे हैं. ऐसे में कुछ समस्याओं को सुलझाने में समय लगना स्वाभाविक है. हमें यह भी याद रखना होगा कि आयोग के अध्यक्ष का कार्यभार केवल 3 वर्षों का है.  ऐसे में प्राथमिकताएं भी निश्चित करनी पड़ती है. जनजातीय समाज के सर्वांगीण विकास से जुड़ें व्यापक मुद्दे सुलझाने को लेकर माननीय हर्षजी का आग्रह है. हमें यह भी याद रखना आवश्यक हैं कि प्रमुखता से आयोग एक परामर्शकारी निकाय है, क्रियान्वयन के दाइत्व उसके अधिकारक्षेत्र मे अधिकतर नहीं हैं. मुझे जितना भी उनका सानिध्य प्राप्त हुआ है उसके आधार पर मैं यह पुरे विश्वास के साथ कह सकता हु कि उनका उद्देश्य जनजाति समाज के सर्वांगीण विकास को लेकर स्पष्ट और नेक है. 

उनके जन्मदिवस के शुभ अवसर पर आज उनको हार्दिक शुभकामनायें प्रेषित करते हुए उनके उत्तम स्वास्थ्य के लिए एवं समाज के विकास को लेकर उनके सभी कार्यों में निरंतर सफलता के लिए प्रभु चरणों में प्रार्थनाएं!