Sunday, 29 December 2019

स्वतंत्रता सेनानी भाऊसाहेब मोरे

15 ऑगस्ट 1947 साली भारताला ब्रिटिश राजवटी पासून स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताचे पाहिले पंतप्रधान श्री. पंडित नेहरूंच्या "ट्रिस्ट विथ डेस्टिनी " या प्रसिद्ध भाषणासह सम्पूर्ण जग निद्रेत असताना भारतीयांनी स्वांतत्र्याच्या नव्या स्वर्गात प्रवेश केला. स्वातंत्र्य प्राप्तीच्या जल्लोषासाह नव-स्वतंत्र राष्ट्रासम्मुख फाळनिच्या कटु अनुभवाव्यतिरिक्त अनेक गंभीर समस्या उभ्या राहिलेल्या होत्या. त्यात ब्रिटिष साम्राज्याच्या अधिसत्तेखाली आपले स्वतंत्र अस्तित्व जोपसु पाहणाऱ्या सुमारे 564 संस्थनांच्या विल्लीनीकरणाचा प्रश्न अतिशय गंभीर तेवढाच नाजुक होता. पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे कणखर नेतृत्व आणि मुत्सद्देगिरि मुळे हैदराबाद, जूनागढ़ व जम्मू आणि कश्मीर याना वगळून अन्य संस्थानांच्या विल्लीनीकरणाचा मुद्दा मार्गी लागला होता. हैदराबाद संस्थानाचा विषय त्वरित निकालात काढून निज़ामाच्या जुलमी जोखडात त्राहि-त्राहि झालेल्या जनतेची मुक्ति करणे नवस्थापित भारत सरकारसाठी अत्यंत जिकरीचे होते. हैदराबादचा शेवटचा निज़ाम मीर उस्मानअली खान याने भारतापासून हैदराबाद संस्थानाचे स्वातंत्र्य जाहिर केल्यानंतर डॉ. बबासाहेब आंबेडकरांनी यासंदर्भात परखड मत व्यक्त केले. ते म्हणतात -"राज्यांना भारतीय संघराज्याशिवाय अस्तित्व असू शकत नाही. भारतीय लोक भारतीय संस्थानांच्या स्वतंत्र्याला कदापिहि मान्यता देणार नाहीत आणि भारतीय संस्थाने ही भारताचा अविभाज्य भाग आहेत "

इत्तर प्रातांमधील भारतीय जनता नव्याने झालेल्या स्वातंत्र्य प्राप्तीचा जल्लोष साजरा करीत असताना हैदराबाद संस्थानातील जनता मात्र रझाकारांनी घातलेल्या हैदोसाचा प्रतिकार करत होती. त्या अर्थी हैदराबाद संस्थानातील भारतीय जनतेसाठी ही दूसरी स्वातंत्र्याची लड़ाई होती. हैदराबाद मुक्ति संग्रामातील दलीत जनतेचे योगदान अनन्यसाधारण आहेत पण स्वंतंत्र्योत्तर भारतीय इतिहास लेखनात त्याबाबतीतल्या नोंदी नाहीच्या बरोबरित आहेत. किम्बहुणा यसंदर्भातील काही. नोंदी चुकीच्या दृष्टिकोनातून लिहिल्या गेल्या आहेत. हे खरे आहे की बी. एस. व्यंकटराव, भैय्यारेड्डी रामस्वामी यासारखे दलीत नेते निझामी सत्ता आणि इत्तेहादुल च्या अहारी गेले होते. पण या नेत्यांना व्यापक आम्बेडकरवादी  जनतेने कधीही आपले मानले नाही. वास्तविकता ही आहे की हैदराबाद मुक्तिसंग्रामत आजच्या महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड़ आणि परभनी या जिल्ह्यांतील दलीत जनतेने बाबासाहेबांच्या नेतृत्वात 'शेडूल्ड कास्ट फेडरेशन' या संगठनेच्या माध्यमातून निझामि जुलूमचा भक्कमपणे विरोध केला.

हैदराबाद या संस्थानातील दलीत जनतेची अवस्था दयनीय होती. अज्ञान आणि दरिद्रयामुळे हा समाज गलितगात्र झालेला होता. मुस्लिमांचे शासन आणि प्रशासनातील प्राबल्य अनाकलनीय होते. निझामि राजवटीचे मुस्लीम राज्यात रूपांतर करण्यासाठी तयार झालेल्या 'इत्तेहादुल मुसलमीन' आणि रझाकर या संगठनानी दलितांबरोबरच इत्तर असहाय हिन्दू समाजातील लोकांचे मुस्लीम धर्मात परिवर्तन घडवून आणण्याचे षड़यंत्र चालविले होते. या मागचे मुख्य कारण म्हणजे हैदराबाद संस्थानात मुस्लीम जनसंख्या केवळ 18% होती. मुस्लीम लोकसंखेचे प्रमाण वाढविण्यासाठी निझाम आणि राझाकारांचे प्रयत्न चालू होते. यासाठी या संगठनांनी निझामी राजवटित आरंभलेल्या राष्ट्रवादी आणि सुधारनावादी चळवळींचे  दमन करण्याचे धोरण अवलंबले होते.

यासोबतच त्यांनी पाकिस्तानातून आणि उत्तर हिंदुस्तानातून अनेकांच्या संखेने मुस्लिमांना बोलावून हैदराबाद संस्थानात स्थाईक करविले होते. मुस्लीम धर्माचा प्रसार करणे हे मुस्लिमांचे धार्मिक कर्तव्य आहे अशी या संगठनांची धारणा होती. याच मोहिमेचा एक भाग म्हणून दलितांचे मुस्लीम धर्मात धर्मांतर घडवून आणण्याचे काम मोठ्याप्रमाणात या संगठनांनी चालविले होते. त्यासाठी दहशत आणि आमिष या मार्गांचा वापर केला जात होता. यात भर म्हणून काय तर निझामाच्या मंत्रीमंडळात असलेल्या बी. एस. व्यंकटराव आणि कार्यमंडळात असलेल्या श्यामसुन्दर या दलीत नेत्यांनी 'डिप्रेस्ड क्लास असोसिएशन' नावाची संगठना ऊभी केली. या संगठनेच्या माध्यमातून त्यांनी निझामाच्या हिन्दू समाज विरोधी कृत्यांचे समर्थन करणे सुरु केले. 

पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निझाम आणि त्याच्या आश्रयात असलेल्या मुस्लीम संगठनांचे हे कुटिल कारस्थान फार जवळून ओळखले होते. त्यांचे हे मनसूबे बाबासाहेबांनी 'शेडुल्ड कास्ट फेडरेशन' च्या माध्यमातून हाणून पाडले. 'डिप्रेस्ड क्लास असोसिएशन' च्या निझाम समर्थक धोरणांचाहि बाबासाहेबांनी सड़ेतोड़ विरोध केला. हैदराबाद संस्थानाचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण व्हावे यासाठी बाबासाहेब फार आग्रही होते. दलीत समाजास उद्देशुन बाबासाहेबांनी 1947 साली निझामाविरुद्ध एक आरोपनामा  काढला तो असा..
"The Scheduled Castes need freedom and their whole movement has been one of freedom. The Scheduled Castes of Hyderabad under no circumstances  should side with Nizam or Razaakars"

इ. स. 1933 नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी औरगांबाद आणि आजच्या मराठवाड्यातील इत्तर जिल्ह्यांत वारंवार भेटि दिल्या. त्यांचे सुधारणावादी कार्य आणि निझामाविरुद्धची भूमिका यांची खबर निझामापर्यंत पोहोचल्यानंतर बबासाहेबांवर निझामाच्या हद्दीत प्रवेषबंदी घातल्या गेली. अश्यावेळी बाबासाहेबांचे विचार आणि कार्य यांची धुरा सांभाळण्याचे काम त्यांच्या जवळच्या आणि विश्वासु सहकाऱ्यांनी केले. अश्या सहकाऱ्यांमधे स्व. श्री भाऊसाहेब मोरे यांचे नाव अग्रस्थानी येते.

भाऊसाहेब मोरे उपाख्य बी. एस. मोरे यांचा जन्म 11मार्च 1915 साली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड़ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शिवराम बाळाजी मोरे. ते ब्रिटिष सरकारच्या टपाल खात्यात नौकरीला होते. बालपनापासूनच भउसाहेबांना शिक्षणाची आवड त्यामुळे चाळीसगावला प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्याना पुण्यात धाडण्यात आले. पुण्यात बाबासाहेबांच्या प्रयत्नांमुळे समाजातल्या उपेक्षित घटकांच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अहिल्या आश्रम नावाचे वसतिगृह चालविले जात असे. तेथे राहून भउसाहेब पुण्यातल्या एस. पी. महाविद्यालयातून पदवीधर झाले. पदवीधर होणारे ते मराठवाड्यातील पहिले विद्यार्थी ठरले.

चळवळया प्रवृत्तीच्या भउसाहेबांवर  पुण्यात असता पासूनच आंबडेकरी विचारांचा प्रभाव जडला. याशिवाय राष्ट्रीय कांग्रेसच्या नेत्यांच्या सभा आणि भाषणे त्यांनी आवर्जून ऐकली. त्यामुळे आपुसकच त्यांच्यावर राष्ट्रीय विचारांचे संस्कार झाले. म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांच्या हाकेला साद देत निझाम संस्थानातील सम्पर्क अधिकारी या ग्याजेटेड अधिकारी पदाचा त्याग केला आणि समाजसेवेला वाहून घेतले. मराठवाड्यातील बाबासाहेबांचे ते अत्यंत निकटचे सहकारी होते.

मराठवाड़ा आणि खानदेश भागातील निझमविरुद्ध पहिली परिषद 30 डिसेम्बर 1938 साली कन्नड़ तालुका, जिल्हा औरंगाबाद येथील मक्रणपुर या गावी झाली. भाउसाहेब मोरे या परिषदेच्या प्रमुख आयोजकांमधे होते. अहोरात्र परिश्रम करुन आजच्या मराठवाड़ा आणि खान्देशातील मोठा जनसमुदाय त्यांनी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनासाठी एकत्र आणला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ओझस्वी भाषणातून अनुयायांना निझामाच्या भूलतापांना बळी न पडण्याविषयी सुचविले. या परिषदेतील बबासाहेबांच्या निझमविरुद्ध स्पष्ट भूमिकेमुळे हैदराबाद संस्थानातील प्रजेच्या जबाबदार राज्य पद्धतीच्या मागणीला आणि हैदराबाद स्टेट कांग्रेसच्या लढ्याला बळ प्राप्त झाले.

याच परिषदेतेतच  भउसाहेबांनी 'जय भीम' चा उदघोष केला आणि तेव्हापासूनच आम्बेडकरी विचार आणि चळवळीला जगणाऱ्या कार्यकर्त्यांमधे 'जय भीम' चा नारा प्रसिद्धीस आला. 'मक्रणपुर परिषद' या नावाने प्रसिद्ध  हैदराबाद मुक्तिसंग्रामातील एका महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनेला  या वर्षी 81 वर्ष झालीत. या परिषदेचा 81वा वर्धापन दिवस मक्रणपुर येथे साजरा होतोय. त्यानिम्मित डॉ. बाबासाहेब अम्बेडकर आणि श्री भाऊसाहेब मोरे यांच्या पावन स्मृतीस विनम्र श्रद्धांजली !

1 comment: